संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) मराठी विभागातर्फे, मराठी भाषा गौरव दिन आणि कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ.इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय औरंगाबाद येथील निवृत्त प्राचार्य , ज्येष्ठ अनुवादक व लेखिका डॉ. छाया महाजन बोलत होत्या. या प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य होत्या.