‘देवमुद्रा मुव्हमेंट स्कूल’ या भरतनाट्यम, कुचीपुडी इत्यादी नृत्य प्रकारात गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना पारंगत करणाऱ्या संस्थेमध्ये तीन-चार वेळेला जाण्याचा प्रसंग आला. दरवेळी तितकाच आनंद विद्यार्थिनींचे परफॉर्मन्स पाहून आला. त्यांच्या वयाने लहान मोठ्या विद्यार्थिनी सोबत खूप छान वेळ गेला. त्यांच्या लायब्ररीलाही भेट दिली. संस्थेच्या संचालिका सौम्यश्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख श्री. जयंत शेवतेकर, श्री. सोदि व श्री. अण्णा वैद्य यांच्या समवेत ‘प्रतिभा’ या कार्यक्रमाला उपस्थित होते.