अभिप्राय: वळणावर

वळणावर हा कथासंग्रह खरोखरच वाचनीय व चांगला वाटला. त्यातील वळणावर ही कथा मला फार आवडली. – स्वप्नल ए. भाटे, पुणे

अनुकरण, तुलना, योगायोग सादृष्य वगैरे आता छाया महाजन यांच्या लिखाणापासून कुठल्याकुठे मागे पडलेले आहे. मूळात तसे काही नसेलच/नव्हतेच. तुम्हाला अरविंद गोखल्यांची साक्ष देण्याचे कारण नाही. फॉर्म ज्याचा त्याचा स्वयंभू स्वतंत्र असतो आणि असावाच. — अनंतराव अं. कुलकर्णी, २३/११/१९९१, नारायण गाव


व्यत्तिंचा जीवनसंघर्ष दाखविण्याच्या उद्देशाने लेखिका समाजातिल भ्रष्टाचार, ढासळती नीतीमूल्ये यावर भाष्य प्रगट करते. अधोगती होत चाललेल्या समाज मनाचे नागडे उघडे चित्र अत्यंत संयमाने लेखिका आपल्या पुढे उभे करते. पुरुषापेक्षा वेगळे असे स्त्रीलाच उमगलेले स्त्रीचे दु:ख लेखिका मांडते. — वसुंधरा तारकर, वाङ्मय शोभा, फेब्रु. १९९३


या कथासंग्रहातून स्त्रीचं मन कसं असतं हे उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढे हक्क पुरुषाला मिळाले आहेत तेवढे हक्क अद्यापही स्त्रियांच्या वाट्याला आलेले नाहीत… हे दुष्ठचक्र हे समाज बंधन कधी कमी होणार हा प्रश्‍न देखील काही कथांमधून विचारला गेलाय. नव्या वाटा चोखाळणारा कथासंग्रह आहे. वादळी आव्हान स्विकारणारा असल्यामुळे तो वाचनीय व विचार करायला लावणारा आहे. — बळवंत बडवे, नांदेड, २५मार्च १९९२


समाज मनाला एक चौकट असते. चौकटी बाहेर जाऊन जीवनाचा वेध घेणं चौकटीतल्या बधीर मनाला पटत नाही. स्त्रिच्या दुय्यम दर्जाची जाणीव तिला पदोपदी दिली जाते म्हणून स्वत:च्या आस्तत्वासाठी आजची स्त्री धडपडते आहे… मनात सलणारी दु:ख, वेदना ती मांडू पाहते आहे पण पुरुषप्रधान संस्कृतीत प्रत्येक वळणावर तिचा कोंडमाराच होतो. स्त्रियांच्या सामाजिक, मानसिक व्यथा, वेदना कुचंबणांची सरमिसळ म्हणजे वळणावर हा कथासंग्रह. – ससे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *