अलिकडे शांताबाई शेळके यांनी लघुनिबंध या वांड्मयप्रकाराचे पुनरुजीवन केले आहे. तुम्हीही लघुनिबंधाच्या धारणीचं ललित गद्य लिहीत आहात. अनेक विषयांवरचे तुमचे लघुनिबंध वाचनीय आहेत. जीवनातल्या अनेक अनुभवांचे चित्रण करण्याची आणि त्यातून जीवनाची समज वाढविण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे. अनेक वाचकांना ते आवडेल व मार्गदर्शक ठरेल. तुमचे लघुनिबंध काही विशिष्ठ आकार धारण करतात. अनुभवांचे चित्रण व नंतर त्याचे मर्मदर्शन असे त्याचे स्वरुप असते. — गंगाधर गाडगीळ, २० ऑक्टोबर, मुंबई