खुप तातडीच्या कामात गळ्यापर्यंत रुतलेला असुनही सहज चाळायला म्हणुन कादंबरी हातात घेतली ती संपुर्ण वाचुनच टाकली. कादंबरी विलक्षण आहे. अंतर्मुख करणारी आहे. या कादंबरीचे भाषांतर करून तुम्ही एक महत्त्वाचे कार्य केलेले आहे व त्याबल तुमचे मन:पुर्वक अभिनंदन. – निशिकांत मिरजकर, दिल्ली
सॉल बेलोच्या हरझॉग या कादंबरीतील प्रयोगशीलता समजुन घेणे ही सोपी गोष्ट नाही. तुमच्या या अनुवादाने हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. म्हणुन मला तुमचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते. यशस्वी अनुवाद करण्यासाठी मुळ लेखकाची संवेदनशीलता स्वत:ची बनवावी लागते. ती दत्तक घेऊन भागत नाही. तर तीला या आपल्या अनुवादात सॉलबेलोची संवेदनशीलता नव्याने जन्माला घालून एक नवनिर्मिती केल्याचे जाणवते. मराठीला एक सर्जक अनुवाद दिल्याबल मी तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. – डॉ. सुधीर रसाळ, औरंगाबाद
एक अभिजात कलाकृती मराठीत आणण्याचं मोलाचं कार्य आपण केलं त्याबल मी अभिनंदन करतो. – रविंद्र घवी, गोवा
सॉल बेलोच्या लेखनाची वैशिष्ठे या अनुवादात छानच उतरली आहेत. अनुवादासाठी तशी ही कादंबरी अवघडच आहे. पण तुम्ही हे शिवधनुष्य घेतले आहे. माझ्र्या अनेक मित्रांना ज्यांना इंग्रजी येत नाही आता मी हे पुस्तक रिकमेंड करू शकतो. — विजय पाडळकर, नांदेड.
एक मोठी महत्त्वाची कलाकृती मराठी आणुन तुम्ही वाचकाची फार मोठी सोय केलीत, मराठीचे दालन समृद्ध व्हायला हातभार लावलात. अनुवादाचे कार्य मी अतिशय महत्त्वाचे मानतो. त्यामुळे वाचक, समीक्षक, लेखक सर्वेच वेगळ्या विश्वात जातात. — चंद्रकांत बांदिवडेकर, मुंबई.
तुम्ही अगत्यपुर्वक पाठविलेले हरझॉग पुस्तक वाचले. अनुवाद चांगला वाटला, अभिनंदन. – डॉ. विजया राज्याध्यक्ष, मुंबई
असे लेखन भाषांतरीत अनुवादित करणे ही एक कसोटीच असते. आपण या कसोटीला पुरेपूर उतरला आहात. याबल आपले अभिनंदन. सॉल बेलोची ही कादंबरी आपल्या परिश्रमपुर्वक केलेल्या भाषांतरामुळे वाचण्याचा योग येत आहे. — मधुमंगेश कर्णिक, मुंबई.
छायाताई —— २/३ दिवस जरा गडबडीत होतो त्यामुळे अभिप्राय देण्यासाठी उशीर झाला त्या बद्दल सर्वप्रथम क्षमस्व ; —
आताशा वैचारिक मंथन करणारे पुर्वीपेक्षा खुप कमी झाले आहे त्यात तुमची पकड विलक्षण आहे म्हणूनच तुमच्या शब्दांना सहजगत्या न सापडणारे सत्व आहे जो फार मोठा मंगल स्त्रोतराचा अखंडपणे वाहणारा सात्त्विक प्रवाह आहे ;
तुमचे या नवीन क्षेत्रातील पाऊल विविध भावभावनांचे विलोभनीय पौर्णिमेचे चांदणे ठरेल जे कायम स्वरूपी सुखनैव समाधानाचे जोगवा देणारे ठरेल याचा मला केवळ विश्र्वास नाही तर खात्री आहे ;
हार्दिक अभिनंदन नी पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा —-!
सुभाष तोंडोळकर औरंगाबाद ४/१०/२०