अभिप्राय: कॉलेज

लेखिकेची तडफड, घुसमट कादंबरीच्या प्रत्येक पृष्ठावर व्यक्त होते. – वृंदा भार्गवे (मटा.१४ जानेवारी २००७)

कॉलेज ही पात्र प्रधान कादंबरी नसून समुह प्रधान कादंबरी आहे. समुहप्रधान असून बांधीव आहे. तिच्यातील सुक्ष्म कोलाहल आपल्या अंत:करणात तीव्र झंकार निर्माण करील त्यासाठी विकृतिची, लैंगिकतेची, रोमान्सची, उखडेल तंत्राची आणि पर्खल पॅचेसची तिला कुठेच आवश्यकता पडलेली नाही. – डॉ. द.भि. कुलकर्णी, युगवाणी, एप्रिल-मे-जून २००७

अत्यंत सहज सुंदर शैली आपल्याला लाभली आहे. वातावरण निर्मिती विषयाला अनुरुप असा आकार घेतघेत वाचकांची उत्कंठा वाढवते. या कादंबरीने वाचकांचे व समीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. – लीला दिक्षित, पुणे, ३०/१/२००७

कादंबरीतील सगळे प्रसंग मुख्य विषय मुलाशी व्यवस्थितपणे गुंफले गेले आहेत. आज स्त्री पुरुष संबंधांच्या लैंगिक व्यवहारावर इतकं मोकळेपणी लिहीलं जात असताना तो विषय अस्पर्श ठेवून लेखिका कॉलेज विश्वातील स्टाफ मधील राजकारण अतिशय सुक्ष्मपणे मांडते.. भडक वर्णने टाळून गंभीरपणे लिहीलेली रंजनाच्या पलीकडे जावुन वास्तवाचे मोठ्या संयमाने चित्रित केलेली ही कादंबरी सनसनाटी नसून बळकट आशय व्यक्त करते. – सुषमा लेले, बडोदा.

सध्याच्या महाविद्यालयीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वकष आलेख करणारी आणि अंतर्मुख करणारी सामर्थ्यशील कादंबरी आहे. – डॉ. राजश्री पवार हमणे, फुलंब्री. मानवी मनाचे आपण फार प्रभावी आणि नेमके चित्रण केले आहे. – वि.द. अटकेकर, पुणे, १२/१०/२००७

कादंबरीतील व्यक्तिचित्र आणि घटना जीवंत वाटतात. ओघवत्या शैलीतून एखाद्या चित्रपटासारखी घटनांची शृंखला वाचकाच्या डोळ्यासमोरुन जाते. पुढे कादंबरी चिंतनाच्या पातळीवर पोचते. उल्लेखनीय म्हणजे लेखिकेने पाळलेली अलिप्तता. स्त्रि असूनही तिने कादंबरीतील सर्व पुरुषपात्रे पुर्णपणे विकसित केली आहेत. – मोरेश्वर देशमुख, औरंगाबाद, म टा रविवार ४ फेब्रु. २००७

पुस्तक वाचताना जब्बार पटेलांचा सिनेमा तर पाहत नाही ना असं वाटत. तुमच्या पुस्तकात आश्‍लल काही नसतांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. – डॉ. शुभांगी पत्की, पनवेल, २८/३/२००७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *