वाचकाचा अभिप्राय
‘डोईचा पदर आला खांद्यावरी ‘ हे शीर्षक वाचूनच बुचकळ्यात पडलो.ज्या जमाण्यात पदर शिल्लक नाही त्या काळात हे शीर्षक.विचार बाजूला सारून पाहिले पान उघडताच जनाबाईंचा अभंग दिसतो त्याची सुरुवात “डोईचा पदर आला खांद्यावरी ,भरल्या बाजारी जाईन मी” अशी आहे. मग मात्र हे काही वेगळे वाचायला मिळणार याची खात्री झाली.
लेखिकेने उभा केलेला कालावधी त्यातील पात्रे, घटनाक्रम अत्यंत ओघवता आहे.निर्मिती मूल्य उच्च दर्जाचे.नाईकेचे जीवन सुंदर रीतीने उभे केले आहे.कादंबरीचा शेवट मनात अनंत विचाराचे काहूर मांजवतो.
काही किरकोळ संदर्भ लागत नाहीत पण त्यामुळे पुस्तकाच्या एकूण मांडणीस बाधा पोहचत नाही.
एक सुंदर कादंबरी वाचल्याचे समाधान नक्कीच मिळाले.धन्यवाद.