तितिक्षा इंटरनॅशनल पुणे तर्फे छत्रपती संभाजीनगर येथे साहित्यकला संमेलन दिनांक 3 ऑगस्ट 24 ला घेण्यात आले. संमेलनाचे वैशिष्ट्य असे की यात संमेलन अध्यक्ष नाही .पण येथील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. अनेक नवोदित साहित्यिकांना आणि कवींना पुरस्कार देण्यात आला .याप्रसंगी धर्मदाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार,डॉ भवान महाजन, हॅपी सायन्सचे अध्यक्ष कोटा नागूचे ची आणि सतीश इंदापूरकर यांच्यासह मला निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे जमलेल्या साहित्यिकांशी संवाद साधता आला. तीतीक्षा इंटरनॅशनल च्या संस्थापक प्रिया दामले श्री इंदापूरकर व कवयित्री सुनिता कावसानकर यांचे मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा.