आत्ताशी कुठे पावसाळा सुरू झाला असं वाटतंय. मराठवाड्यात मात्र अजूनही ऊन पावसाचाच खेळ आहे. म्हणजे खरा खेळ निसर्गच खेळतोय.
मी पुण्यात आहे आणि इथे कधी पाऊस आणि कधी ढगाळ असं वातावरण आहे. मला ऊन फारसा आवडत नाही म्हणून असेल, हा ऋतू खूप अल्हाददायक आहे असं वाटतं.
आणि हवामान खात्याला सारखी हुलकावणी देत मान्सूनचा झगा घालून भारतभर फिरणाऱ्या वर्षा ऋतुला एकदा तरी हातात पकडावं. आणि कधी जोडावं, कधी झोडावं, कधी मिठीत घ्यावं, कधी डोळे भरून पाहावं असं वाटत राहतं. तुम्हालाही तसेच वाटत असेल.
असं वाटतं की इतर शोध लावत असताना प्राथमिकतेने पावसाच्या नियमनावर एखादा हुकमी एक्का काढून त्याचा नियंत्रण माणसाने आपल्या हाती आणावे. आता ही प्रार्थना कोणाला करावी?